Monday, March 26, 2018

Pimpri : नोटा बदलताना मृत्यू झालेल्या नागरिकांना काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण






एमपीसी न्यूज - मागील वर्षी 8 नोव्हेंबर, 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. 1000 व 500 रुपयांच्या नोटा अचानक चलनातून हद्दपार झाल्याने देशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. चलन पुरवठा अत्यल्प झाल्याने एटीएम बाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या. गर्दीमध्ये अनेकांचे प्राण गेले. नोटा बदलताना गर्दीमध्ये ज्या नागरिकांचे प्राण गेले, त्यांचा स्मृतिदिन म्हणून आज (दि. 8 नोव्हेंबर) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या वतीने भोसरी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्या निगार बारसकर, प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष अशोक मोरे, महासचिव अशोक मंगल, पिंपरी चिंचवड काँग्रेस विभाग अध्यक्ष उमेश बनसोडे, प्रभारी राजन पिल्ले, उपाध्यक्ष सतीश पैठणकर, सदस्य मंगल मोहिते, एस. टी. कांबळे, रोहन वाघमारे, दिलीप पांढारकर, शांताराम मोरे, पोपट पवार, राजू साळुंखे, केरबा शिंदे, बाळासाहेब काळे, संदीप मोरे, विकास चव्हाण, राज वैद्य, सांगदेव गालफाडे, आंबादास म्हेत्रे, साहेबराव निंबर्गीकर, रमेश सरोदे आदी उपस्थित होते. 

श्रद्धांजली सभेत बोलताना भारतीय काँग्रेस समिती सदस्य निगार बारसकर म्हणाल्या की, सरकारने अचानक घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाने देशातील खूप नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. चलन तुटवड्यामुळे मुलींची लग्ने मोडण्याची वेळ काही वधुपित्यांवर आली. तसेच काही निरपराध लोकांचा बळी देखील यामध्ये गेला. जनतेच्या या दुःखाची जराही कल्पना या सरकारला नसून नोटबंदीचे एक वर्ष सरकारकडून साजरे करण्यात येत आहे. ही बाब निषेधार्थ आहे.

पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे यांनी या दिवसाचा 'काळा दिवस' म्हणून उल्लेख केला. उपस्थित सर्वांनी यावेळी दोन मिनिटे मौन बाळगून नोटबंदीचा निर्णय व नोटा बदलताना गर्दीत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.



Dailyhunt

No comments:

Post a Comment

आंबेडकर नगरात ” संविधान गौरव दिवस ” साजरा

चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने  नेहरूनगर येथील आंबेडकर नगरात “संविधान गौरव दिवस”...